यवतमाळ जिल्ह्यात उद्या शाळांसह महाविद्यालयांना सुट्टी
यवतमाळ / वृत्तसंस्था
यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वा शाळांबाबत मोठा निर्णय घेतलाय. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवार, ३१ जुलैला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश सर्व शासकीय, अनुदानित व खासगी शैक्षणिक संस्थांना लागू करण्यात आलाय.”


