न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ म. सिंधुदुर्ग या संस्थेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. आज 30 जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. टी. चौगुले यांनी काम पाहिले.

बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी पुढील प्रमाणे
अध्यक्ष गजानन संभाजी सावंत,उपाध्यक्ष विनोद रामचंद्र मर्गज
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कार्यक्रम पार पडला. श्री. दळवी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. सावंत व उपाध्यक्ष श्री. मर्गज यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी “आपण व आपले सर्व सहकारी यांचे मार्फत मंडळास आवश्यक ते योग्य सहकार्य करू” असे मत श्री. दळवी यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या पोषक वाढीसाठी व सहकारी संस्था सक्षम बनविण्यासाठी सभासद, पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना कार्यक्षम बनविण्यासाठी बदलत्या काळानुसारचे सहकारी शिक्षण-प्रशिक्षण सहकारी मंडळामार्फत देणेत येईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन सावंत व उपाध्यक्ष विनोद मर्गज यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढील प्रमाणे विलासराव बा. ऐनापुरे, गजानन सु. गावडे, मधुसुदन के. गावडे, सुभाष रा. तळवडेकर, केशव र. नारकर, प्रकाश मु. सावंत, श सुरेश ज्ञा. चौकेकर. श्रीम. कुंदा प्र. पै, श्रीम. प्रज्ञा प्र. परब
यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी मंगेश रा. पांचाळ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे