न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

खरात सोबत फोटो असलेल्या आमदार मिलिंद नार्वेकरां बद्दल प्रथम बोला …. संजू परब यांचा रुपेश राऊळ यांना इशारा

 

सिंधुदुर्ग |राजू तावडे

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचे फोटो भोंदूबाबा खरात त्याच्यासोबत आहेत. तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत शेतकऱ्यांसाठी राखीव असलेले पाणी याच खरात बाबाला दिले. याचा प्रथम निषेध करा नंतर आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी करा, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांना दिला. आज सावंतवाडी ते आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, मोर्चा काढणार, आंदोलन करणार, आमदारकीचा राजीनामा घेणार अशी वक्तव्य करणाऱ्यांपूर्वी रूपेश राऊळ यांनी मिलिंद नार्वेकरांवर बोलावे. नार्वेकर यांचे फोटो खरात बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने बघितले आहे. त्याच्यामुळे सर्वपक्ष मोर्चा काढताना त्यांचाही राजीनामा मागावा. त्यांच्या सुद्धा निषेध रूपेश राऊळ यांनी करावा. असे संजू परब म्हणाले.
दीपक केसरकर हे देवभक्त आहेत. आम्ही त्यांच्यासोबत फिरत असतो. कुठचेही मंदिर दिसले की ते तिथे थांबतात, दर्शन घेतात. कोणाच्या कपाळावर लिहिलेले नसते कोण काय आहे ते ? चोरी पकडली जात नाही तोपर्यंत त्याला चोर म्हणता येत नाही. म्हणून उगाच आरोप करू नयेत. जर माणसाचे वाईट गुण असताना परत कोणी त्या माणसाकडे जात असेल तर तो दोषी ठरतो. तेथील मंदिरात दीपक केसरकर जायचे‌. त्यामुळे राऊळ यांनी टीका करण्यापूर्वी आमदार नार्वेकर, उद्धव ठाकरेंच बघाव, राजकारण म्हणून राजकारण करू नका, असा इशारा संजू परब यांनी दिला असा.
तसेच कॉग्रेस हा जिल्ह्यात संपलेला पक्ष आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत १६ मत पडून दोनदा डिपॉझिट जप्त झालेल्यां उमेदवारांच्या टीकेवर मी प्रतिक्रिया देत नाही असा टोलाही संजू परब यांनी हाणला. यावेळी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, क्लेटस फर्नांडिस, महादेव पांगम आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे