न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नगराध्यक्षांनी जनतेला भावनिक करून राजकारण करू नये.. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

नगराध्यक्ष सौ. श्रद्धा भोसले यांनी जनतेला भावनिक करून राजकारण करू नये. ज्याप्रमाणे तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे, त्याप्रमाणे जनतेने आम्हालाही निवडून दिले आहे. त्यामुळे चुकी दिसेल त्याला मी विरोध करणारच. संजू परब आहे ते विरोध होणारच, असे खडेबोल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी सुनावले.
नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सभेमध्ये नगराध्यक्ष सौ. श्रद्धा भोसले ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. नगराध्यक्ष हे रजेवर असल्यामुळे त्यांनी ऑनलाईन सहभागी होऊ नये व त्यांना सहभागी व्हायचे असेल तर प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी बोलू नये अशी हरकत संजू परब यांनी घेतली होती.
दरम्यान सौ. श्रद्धा भोसले यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे आपल्याला चर्चेत ऑनलाइन सहभागासाठी विरोध करून त्यांनी महिलांचा अपमान केला आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. याबाबत आज गुरुवारी संजू परब यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
नगराध्यक्ष सौ. भोसले या रजेवर असून त्यांनी आपला कार्यभार उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांना दिला आहे. त्यामुळे त्यांनी सभेत ऑनलाईन सहभागी होणे योग्य नाही. नियमाने त्यांना रजेवर असताना ऑनलाईन सगळे सहभागी होता येत असते तर मी घेतलेल्या हरकतीला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. पण ते काहीच बोलले नाहीत. सभेचे नियम प्रभारी नगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांना माहित असल्या मुळे त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया बंद केली. त्यांनी योग्य निर्णय घेतला म्हणून मी पुन्हा त्यांचे कौतुक करतो असे परब म्हणाले.
सावंतवाडी नगर परिषदेच्या फेसबुक वर फक्त विधायक कामांबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. मात्र त्या ठिकाणी काही पोस्ट टाकून राजकारणात करण्यात आले आहे असे परब म्हणाले. आम्हालाही जनतेनेच निवडून दिले आहे. त्यामुळे महिलांचा अपमान केला असे जनतेला भावनिक आवाहन करून कोणी राजकारण करू नये. असा इशारा सौ. भोसले यांना परब यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे