टोमॅटोचे भाव कवडीमोल…५ते ७ रुपये दर… नाशिकात शेतकरी हवालदिल
नाशिक / वृत्तसंस्था
नाशिक जिल्ह्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी मोठा खर्च करत टोमॅटोची लागवड केली,मात्र गेल्या काही दिवसांपासून दर मात्र फारसे मिळत नाही,साध्य 20 किलोच्या क्रेट ला अवघा 100 ते 125 रुपये म्हणजेच 5 ते 6 रुपयाचा दर मिळत असून लागवडीसाठी केलेला खर्च शिवाय तोडणीचा खर्च,गाडीचे भाडे वसूल होत नाही,त्यातच पिकलेल्या टोमॅटो व्यापारी घेत नसल्याने तो उकिरड्यावर फेकून द्यावा लागत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.”


