सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने मंगळवारी ॲड. विवेक गोखले यांना श्रद्धांजली
सिंधुदुर्ग / राजू तावडे
वैभववाडी येथील ॲड. विवेक गोखले यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी हृदय विकारच्या तीव्र झटक्याने सोमवारी दुदैवी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने मंगळवारी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व जिल्हा न्यायालयात रेफेरेंस करण्यात आला. या प्रसंगी प्रधान जिल्हा न्यायाधीश डॉ. देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी न्यायाधीश वर्ग, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, व कर्यकारिणी पदाधिकारी, बीसीएमजी सदस्य ॲड. संग्राम देसाई, जिल्हा सरकारी वकील ॲड. संदीप राणे व त्यांचे सहकारी, तसेच जिल्ह्यातील वकील वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावी ॲड. विवेक गोखले यांचा जन्म झाला. त्यांनी एल एल बी शिक्षण रत्नागिरी येथे पूर्ण केले .
२०१६ -१७ पासून वकिली व्यवसायाला सुरवात केली. दिवाणी न्यायालय कणकवली , वैभववाडी येथे ते वकिली व्यवसाय करत होते.
ॲड. विवेक गोखले हे उत्कृष्ट नाटककार , तबलापट्टू तसेच कीर्तनकार देखील होते. ते कीर्तनाचे कार्यक्रम करत असत. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


