सिंधुदुर्ग जिल्हा पतंजलि परिवारातर्फे सावंतवाडीत गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्हा पतंजलि परिवारातर्फे योग वर्गामध्ये होम हवन करून आपल्या गुरुंना वंदन करण्यात आले. बाबली गवंडे यांनी होमहवन केले. पतंजलि परिवारा तर्फे दरवर्षी साजरा होणारा गुरुपौर्णिमा कार्यक्रम यंदा पतंजलि योगवर्ग, वैश्यवाडा,सावंतवाडी येथे साजरा करण्यात आला.
यावेळी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी विद्याधर पाटणकर, सह जिल्हाप्रभारी दत्तात्रेय निखार्गे, भारत स्वाभिमान जिल्हा पूर्वप्रभारी महेश भाट, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी सुभाष गोवेकर, ज्येष्ठ योगकर्मी दत्ताराम सडेकर, सौ. सडेकर, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी योगेश येरम, ज्येष्ठ योगशिक्षक दिलीप भाईप, पतंजली योग समिती सावंतवाडी तहसील प्रभारी बाबली गवंडे, सोशल मीडिया तहसील प्रभारी लक्ष्मण राणे, किसान सेवा समिती तहसील प्रभारी नारायण राणे, ज्येष्ठ योगशिक्षिका डॉ. सौ. रोहिणी बांदेकर, सौ. अपर्णा भाईप, महिला पतंजली सावंतवाडी तहसील संघटनमंत्री सौ. मृणाली गवंडे, कोषाध्यक्ष सौ. श्रद्धा सावंत, सह योगशिक्षक संजय म्हापसेकर, संदीप पाटे, डॉ. सौ. समता धुरी, योगसाधक तुकाराम कुमठेकर, पूजा शिरसाट, राधिका मुंज तसेच योगसाधक आदि उपस्थित होते.
पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि योगसाधकांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून यावेळी गेली पंचवीस वर्षे निस्वार्थ वृत्तीने आणि सद्भावनेने योगप्रचार आणि योगप्रसारासाठी निरंतर कार्यरत राहणारे ज्येष्ठ योगकर्मी दत्ताराम सडेकर आणि सौ. सडेकर या उभयतांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा महिला पतंजली समिती सावंतवाडीचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम पतंजलि योगवर्ग, पोलिस लाईन हॉल, सावंतवाडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला योगसाधकांनी योगनृत्य सादर केले. विशेष योगवर्ग महिला पतंजली सावंतवाडी तहसील संघटनमंत्री सौ. मृणाली गवंडे यांनी घेतला.


