न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आठ हजारांचे बिल थेट आठ लाखांवर; सावंतवाडीत विरोधी नगरसेवक आक्रमक

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडी  पालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला लक्ष्य केले आहे. एका प्रकरणात ८ हजार रुपयांचे बिल तब्बल ८ लाख रुपये झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित बिले बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये मोठा अपहार झाल्याचे उघड होण्याची शक्यता असून, याची सखोल चौकशी करून नेमका किती अपहार झाला आहे, हे बाहेर येणे गरजेचे असल्याचे विरोधी नगरसेवकांनी म्हटले आहे.

यासाठी नगराध्यक्षांनी प्रशासनाला आदेश द्यावेत आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमावी, अशी मागणी विरोधी गटाचे नगरसेवक बाबू कुडतरकर, नीता कविटकर, शर्वरी धारगळकर आणि देव्या सूर्याजी यांनी केली. त्यांच्या मागणीला संजू परब यांनीही अनुमोदन दिले.

या प्रकरणाला धागा पकडून नीता कविटकर यांनी सभापती प्रतीक बांदेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, संबंधित लांखे नामक कर्मचारी अनेक वर्षांपासून पालिकेत काम करत असल्याने त्याला संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असून, प्रशासनाला त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे