न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सत्तरी तालुक्यात पावसाचे धुमशान… वेळूस नदीला पूर… दत्त मंदिर पाण्यात

साखळी/ प्रतिनिधी

चोर्ला घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेळूस नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे ठाणे ग्रामपंचायत हद्दीतील पाली-सतरी येथील श्री दत्तात्रेय मंदिर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. सुदैवाने वृत्त लिहिपर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नैसर्गिक पडझडीची माहिती समोर आलेली नव्हती.

मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पाण्याचा फटका मंदिर परिसराला बसला. मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. मंदिराकडे जाणारा रस्ता आणि प्रवेशमार्ग काही काळ पाण्याखाली गेल्याने भाविकांना मंदिरात प्रवेश करता आला नाही. तसेच मंदिराशेजारील शेतांमध्येही पाणी शिरल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मंदिर परिसरात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुमारे दोन तासांत नदीचे पाणी ओसरू लागल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे