न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

HSRP नसलेल्या 172 वाहनांवर कारवाई -उपप्रादेशिक परिवहन विभागाची विशेष मोहीम

 

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर 

 महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर High Security Registration Plate (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग मार्फत १ जुलै २०२६ पासून जिल्हाभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे.

 

या मोहिमेअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग च्या वायुवेग पथकांमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये HSRP नसलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येत असून, आजअखेर एकूण १७२ वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 

HSRP ही केवळ कायदेशीर सक्ती नसून वाहनांची सुरक्षित ओळख, बनावट क्रमांक प्लेटींना प्रतिबंध, वाहन चोरीचा शोध तसेच वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारकाने आपल्या वाहनावर HSRP बसविणे आवश्यक आहे.

HSRP नसलेल्या वाहनांवर ₹१,००० इतक्या दंडाची तरतूद असून, वाहनधारकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ HSRP बसवून घ्यावी. उपप्रादेशिक परिवहन विभागाची विशेष अंमलबजावणी मोहीम पुढेही सुरू राहणार असून, HSRP नसलेल्या वाहनांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

यामुळे सर्व वाहनधारकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून अधिकृत माध्यमातून HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे