न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबोलीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार जणांची सुखरूप सुटका

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

महाराष्ट्रातील सर्वाधिक  पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोली येथील नांगरतासवाडी परिसरात भात लावणीसाठी गेलेले चार शेतकरी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच ‘सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुपच्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत या चारही जणांना सुखरूप बाहेर काढले. आंबोली परीसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पाण्याचा प्रवाह आणि पातळी वाढल्यामुळे हे चारही शेतकरी पलीकडे अडकून पडले होते. या चारही शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आज घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे