शनिवारी ११ वाजता सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आमदार श्री. केसरकर यांच्या वाढदिवस , संजू परब
सिंधुदुर्ग / राजू तावडे
आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या वाढदिवस शनिवार दि.१८जूलै रोजी सावंतवाडी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी सकाळी ठीक ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ठीक ११ वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आमदार श्री. केसरकर यांच्या वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी व आमदार दीपकभाई केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे.


