न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी उभाबाजार गणरायाना सहस्र मोदक अर्पण

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

  अंगारकी संकष्टी निमित्त आज मंगळवारी उभाबाजार तसेच वैश्यवाडा येथील गणरायांची पूजा अर्चा पार पडली.उभाबाजार येथील मंदिरात पूजेचा मान सलील वंजारी यांना सपत्नीक देण्यात आला.तर वैश्यवाडा येथे पूजेचे मानकरी गुरुनाथ मठकर हे होते.यावेळी मोठ्या उत्साहात सहस्र मोदकांचा कार्यक्रम पार पडला.

गणेशोत्सवातील अंगारकी संकष्टी निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी वैश्यवाडा येथे सुमारे ६११२ मोदकांचा नैवेद्य ‘श्रीं’ ना अर्पण करण्यात आला.२१ दिवसपर्यंत असणाऱ्या या गणेशोत्सवात आजच्या अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम श्री. दिक्षित भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली होऊन पूजेचे मानकरी गुरुनाथ मठकर हे होते. दुपारी महाआरती होऊन श्रींना सुमारे ६११२ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

तर सावंतवाडीत सामुदायिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम पार पडला. यावेळी सलील वंजारी यांना सपत्नीक पूजेचा मान मिळाला. त्यानंतर आरती झाली तसेच गणरायाना सहस्र मोदक अर्पण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष रघुनाथ कोरगावकर, बाळू कासार, भरत पडते, किशोर कारेकर, काशिनाथ कोरगावकर, राजेश कारेकर, सदानंद तेंडले, विलास वाळके, काशिनाथ दुभाषी, अरूण भिसे, कपिल कोरगावकर, प्रशांत वाळके, तुषार कोरगावकर, कुंदन टोपले, गुरू मठकर, बाळ चोडणकर, ओंकार मसुरकर, संजू शिरोडकर, शेखर धारगळकर, विकी कारेकर, गौरव कारेकर, संकल्प धारगळकर, कमलेश पोकळे, ओंकार मळीक, यांच्यासह शर्वरी धारगळकर, कृत्तिका कोरगावकर, ॲड. सायली दुभाषी, सपना चोडणकर, रूतिक कोरगावकर, यशश्री कोरगावकर आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे