न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कुडाळ पंचायत समिती महायुतीकडे

सिंधुदुर्ग/

 कुडाळ पंचायत समितीच्या १८ गणांपैकी १३ ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपला ७ तर शिवसेनेने ६ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ५ ठिकाणी बाजी मारली आहे.
आंब्रड मध्ये नितीन महाडेश्वर (भाजप), पिंगुळी ममता राऊळ (उबाठा), साळगाव मध्ये मिलिंद नाईक (शिवसेना), कसाल संतोष कांदळकर (उबाठा), डिगसमध्ये निखिल कांदळगावकर (शिवसेना), माणगाव योगेश धुरी (ठाकरे सेना), झाराप मधून सिताराम तेली (भाजप), जांभवडेतुन बाळकृष्ण मढव (शिवसेना), आवळेगावमध्ये श्रावणी तेरसे (भाजप), वेताळ बांबर्डे मध्ये अश्विनी सावंत (शिवसेना), ओरोस मधून अमित भोगले (भाजप), पावशी करुणा पावसकर (भाजप), नेरुर उत्तर मधून दीप्ती नाईक (ठाकरे सेना), नेरुर दक्षिण मधून अर्चना बंगे (ठाकरे सेना), तेंडोली मंगेश प्रभू (भाजप), घावनळेतुन अर्चना घावनळकर (भाजप), पाट मध्ये प्रियांका दळवी (शिवसेना), गोठोस मधून दिव्यांगी खरात (शिवसेना) हे उमेदवार पंचायत समिती साठी निवडून आले आहेत. दरम्यान पंचायत समितीच्या १८ गणांपैकी भाजप ७, शिवसेना ६ तर उबाठा ५ जागांवर विजयी झाले आहेत…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे