न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी नगरपालिका आयोजित ‘गावठी भाजी महोत्सवा’चे उद्घाटन

सिंधुदुर्ग / राजू तावडे

ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण तसेच स्थानिक गावठी भाज्यांचे आहारातील महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गावठी भाजी महोत्सवा’चे आज उत्साहात उद्घाटन झाले.

गणेश चतुर्थीच्या औचित्य साधून पालिका प्रांगणात या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील तब्बल ३० हून अधिक महिलांनी विविध प्रकारच्या अस्सल गावठी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांनी जास्तीत जास्त गावठी भाज्यांची खरेदी करून स्थानिक महिला उत्पादकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले. महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी दिली.

या वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी सभापती दिपाली भातकर, सुधीर आडिवरेकर, प्रतीक बांदेकर, नगरसेविका नीलम नाईक, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी वैभव अंधारे, परवीन शेख, आसावरी शिरोडकर तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक शेतकरी व महिला उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे