भाजपाने गोवा विकायला काढलाय : विजय सरदेसाई यांचा आरोप
मडगाव/ प्रतिनिधी
मडगावातील भुमीगत वीज वाहिन्या घातल्या मात्र त्याचा फायदा टाटा पॉवरला करून देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितले जात आहे. हे सरकार वीज पुरवठ्यासारखी जनसुविधा खाजगी कंपनीला देत आहे. यांनी गोवा विकायला काढला असा आरोप म.गो.चे विजय सरदेसाई यांनी केला आहे.





