नारळाचे झाड अंगावर पडून छखमी युवकाचे निधन
ठाणे/ प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमधील राई गावात दोन दिवसांपूर्वी धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवका बाबत दुर्दैवी बातमी समोर आली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३५ वर्षीय राहुल अशोक पाटील या दुचाकीस्वाराचा आज उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.


