न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची बदली; सचिन अडसूळ यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची प्रशासकीय बदली करून त्यांची अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांची सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुकुंद चिलवंत यांनी १९ जुलै २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पत्रकारांशी समन्वय साधत सहकार्याची भूमिका जपली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामीण भागातील पत्रकारांनाही माहिती विभागाशी सहज संवाद साधता आला.

दरम्यान, शासनाच्या बदली आदेशानुसार चिलवंत यांची अहिल्यानगर येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी सचिन अडसूळ लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे