न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जमावबंदी आदेश… सरकारला कसली भिती वाटतेय ? रोहित पवार

मुंबई/ वृत्तसंस्था

मुंबईत 23 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या 15 दिवसांच्या जमावबंदीच्या आदेशावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावरून थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारला कसली भीती वाटतेय? तरुणाईला घाबरलात का?” असा थेट सवाल करत रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान विविध कलमांतर्गत जमावबंदी लागू केली आहे. या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना परवानगीशिवाय एकत्र जमण्यास, मोर्चे काढण्यास किंवा सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. याच निर्णयावर आक्रमक होत रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत सरकारला धारेवर धरले

रोहित पवार यांनी फडणवीस यांना उद्देशून लिहिले की, “मा. देवेंद्र फडणवीस साहेब, 23 जुलै पासून 6 ऑगस्टपर्यंत मुंबईत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास रोखणाऱ्या जमावबंदीचे आदेश लागू करण्याचं कारण काय? सरकारला कसली भीती वाटतेय? तरुणाईला घाबरलात का? तरुणाईचा आवाज दाबायचं ठरवलंच असेल तर केवळ ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी घोषित न करता 2029 पर्यंत जमावबंदी किंवा कर्फ्यू घोषित करा, कारण त्यानंतर तरुणाईच तुमच्या सरकारला पायउतार करणार आहे

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे