गेल्या दहा वर्षांत १५२ पेपरफुटी प्रकरणं झालीत… राहुल गांधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राहुल गांधी यांनी पेपरफुटीवर बोलताना म्हटले की, ‘पेपर फुटणे ही मोठी समस्या आहे. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. ते नैराश्यात गेले. शिक्षण व्यवस्था सुधारण्याची ते मागणी करत होते. 152 पेपर गेल्या दशकभरात फुटले आहेत. 5 कोटी विद्यार्थ्यी आणि त्यांच्या कुटुंबाला झळ सोसावी लागली. नैराश्यातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. गेल्या दहा वर्षात एकालाही शिक्षा झाली नाही. कोणीतरी आपली शिक्षण व्यवस्था पोखरत आहे. उद्ध्वस्त करत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. आपले तरुण आंदोलन का करत आहेत? याचा विचार केला पाहिजे.
राहुल गांधी यांनी सांगितले की, नीट परीक्षेवर होणारा खर्च एकूण शिक्षणाच्या तोडीचा आहे. 1.32 कोटी रुपये विद्यार्थी नीट वर खर्च करतात. 1.3 लाख रुपये हा शैक्षणिक बजेट आहे. तरीही पेपर लीक होत आहेत. विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.


