न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

झाराप रेल्वे स्टेशनवर खनिज सदृश्य मातीचे ढिग, डॉ. जयेंद्र परुळेकर

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध मायनिंगचे पेव फुटले आहे. दोडामार्ग आडाळी एमआयडीसी येथील रात्रीच्या अंधारात होत असलेले मायनिंग चर्चेत असतानाच झाराप रेल्वे स्टेशनवर खनिज सदृश्य मातीचे ढिगच्या ढिग येऊन पडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केला. गेल्या आठवड्याभरात पाच रेल्वे ट्रेन भरून ही माती वास्को येथे नेली आहे. सहावी ट्रेन जलदगतीने भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे डॉक्टर परूळेकर यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ही माती दिवसाला शेकडो डंपर्स भरून नक्की कुठून येते याची माहिती मिळत नाहीये.
मळेवाड कोंडुरा की धाकोरा नक्की कुठून ही खनिजमाती एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेर पाठवली जात आहे ते अनाकलनीय आहे. हे देखील निश्चितपणे अवैध मायनिंग असल्याचा दाट संशय डॉक्टर परुळेकर यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे अशी विनंती आता झाराप ग्रामस्थ करत असल्याचे डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे