कर्नाटकात शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात बेळगांवला आणि एक मंत्रीपद?…अनेक नावे चर्चेत
बेंगळुरू/ विनूथा के आर
कर्नाटकमध्ये सिद्धारामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आलेला आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारामय्या यांचा राजीनामा स्वीकारला होता. आता डीके शिवकुमार यांच्या नेतृत्त्वात नव्या सरकारच्या स्थापेनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
काँग्रेसकडून नव्या सरकारमध्ये अनुभवी आणि प्रादेशिक संतूलन साधण्याचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. सूत्रांनुसार वरिष्ठ नेते आणि तरुणांना संधी दिली जाऊ शकते. संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे, त्यात प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.”
बेळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, चिक्कोडी-सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी, रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांची नावे चर्चेत आहेत. सामाजिक प्रतिनिधित्व, प्रादेशिक संतुलन, पक्षनिष्ठा आणि आगामी निवडणुकांची रणनीती या निकषांवर अंतिम निर्णय होण्याची * शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिद्धारामय्या पुत्र डॉ. यतिंद्र, दिनेश गुंडू राव, लक्ष्मी हेब्बाळकर, रामलिंगा रेड्डी, रिजवान अरशद, यू. टी. खादर, शरथ बच्चेगौड, ए. एस. पोन्नन्ना, भैरथी सुरेश यांच्या समावेश आहे.
याशिवाय प्रियांक खर्गे, एम. बी. पाटील, जी. परमेश्वर, कृष्णा बायरेगौडा, ईश्वर खंड्रे, के. जे. जॉर्ज, एच. सी. महादेवप्पा आणि संतोष लाड या नेत्यांच्या नावांचा समावेश डीके शिवकुमार यांच्या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळात असू शकतो, असं म्हटलं जातंय.
कर्नाटकमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांचं लक्ष डीके शिवकुमार यांच्याकडे लागलं आहे. डीके शिवकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत शिवकुमार यांनी खरगे यांचे आशीर्वाद घेतले होते. आजच्या बैठकीत काँग्रेस विधिमंंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणं प्राथमिकता असेल.”


