उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
सिंधुदुर्ग /
उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत असणार आहेत. अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. एस टी महामंडळंच्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला कोकणातील बस स्थानकांची प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी बस स्थानकाची सरनाईक यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी ही घोषणा केली. त्यासोबत ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोकणातील बस स्थानकाच्या आवरात ७८ हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आलाय. सी.एन.जी पुरवठया बाबत आपण असमाधानी असून येत्या काळात एसटी बस इलेक्ट्रिक बस मध्ये रूपांतर केले जाईल असेही सरनाईक यांनी सांगितले


