न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजस्थानात ४० उमेदवारात भाजपला केवळ दोन जागा कॉंग्रसला सर्वाधिक २० जागा…तरीही भाजपचा नगराध्यक्ष

जयपूर/ वृत्तसंस्था

राजस्थानमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. नोहर येथे झालेल्या नगरपालिका निवडणुकांनंतर सोमवारी एक अशी राजकीय घडामोड घडली त्यामुळे सर्वजण चकीत झाले. या निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण समीकरणच बदलून गेले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने ४० पैकी फक्त दोन प्रभागांमध्ये विजय मिळवला, तर काँग्रेसने २० जागांवर यश मिळवले. उर्वरित १८ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे नगरपालिकेच्या अध्यक्षपद काँग्रेसला जाईल असे सर्वांना वाटत होते पण उलट घडलं.”

सोमवारी झालेल्या नगर परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुमित चचन आणि भाजपचे उमेदवार हजान खातून टाक यांना प्रत्येकी २० मते मिळाली. त्यानंतर हे प्रकरण ईश्वर चिठ्ठी टाकून निकालासाठी गेले. या प्रक्रियेमध्ये अखेरीस हजान खातून टाक यांची नोहर नगर परिषद अध्यक्षपदी निवड झाली. या संपूर्ण निवडणुकीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे भाजपने ४० पालिका प्रभागांपैकी फक्त दोन जागा जिंकल्या. असे असतानाही त्यांच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला २० मते मिळाली.

हजान खातून यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून स्वतःच्या प्रभागातून विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेतले आणि अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. त्यानंतर पडद्यामागे राजकीय डावपेच आणि वाटाघाटीला एक आठवडा गेला. सोमवारी जेव्हा नगरसेवकांनी अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान केले, तेव्हा भाजपच्या उमेदवाराला २० मते मिळाली, जी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मतांइतकीच होती. हा फरक म्हणजे भाजपची दोन जागांवरून २० जागांपर्यंत झालेली वाढ ही या नोहर निवडणुकीतील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे