भंगारातील फ्रिजचा स्फोट…. महिला गंभीर
अहिल्यानगर/
भंगारात गोळा केलेल्या फ्रिज कॉम्प्रेसरचा स्पोट होऊन माय लेकीसह तिघे जखमी झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडली आहे.. भंगार गोळा करून विक्री करणारी महिला फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधील कॉपर काढत असताना अचानक स्फोट झाला.. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिला संगीता सोनवणे यांच्यावर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून 18 वर्षीय रोशन सोनवणे हिच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.”


