न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

घावनळे येथे उद्या भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

 श्री स्वामी समर्थ मठ, घावनळे येथे श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्माता परिवार, घावनळे यांच्या वतीने गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असल्याने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व रक्तदाते व स्वामीभक्तांनी या सेवाकार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी 9.00 वाजल्यापासून श्री स्वामी समर्थ मठ, घावनळे (कासमळा) येथे होणार आहे. या शिबिराला सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभणार आहे.

याचबरोबर SSPM हॉस्पिटल, पडवे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, श्री मातोश्री सेवाधाम आरोग्य ट्रस्ट, मुंबई यांच्या माध्यमातून नेत्र तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच केवळ ₹180 मध्ये उत्कृष्ट दर्जाचे चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आरोग्य तपासणी शिबिराची वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 अशी राहणार आहे.

रक्तदानासाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी श्री. अमित चव्हाण (मो. 9130764164) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.

श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष मा. श्री. दादा गवस यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे तसेच मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान; एका रक्तदानाने अनेकांना जीवनदान!” हा संदेश देत या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे