न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरीत दोन एस.टी.मध्ये अपघातात १५ विद्यार्थी जखमी

रत्नागिरी/

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे अशातच दोन एसटी बसेसमध्ये मोठा अपघात झाला आहे या अपघातात शाळेत जाणारे १५ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

रत्नागिरी येथील मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवले पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. या अपघातात पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातात एका बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे