न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

“त्ना” नाल्यावर स्लॅब घालण्याचे काम सुरू नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा पाठपुरावा

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ मधील शाळा नं ३ मागील नाले बरीच वर्षे उघडे आहेत. येथील रहिवाशांना रस्ता देखील नसल्याने आपत्कालीन स्थितीत गाडी घराजवळ जात नाही. यामुळे अनेक समस्या उद्भवत होत्या. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी हा प्रश्न सोडवत येथील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे.
या नाल्यावर स्लॅब घालण्याचे काम सुरू झाले असून नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. या कामाची पाहाणी त्यांनी आज बुधवारी केली. यावेळी प्रथमेश प्रभू, संकल्प धारगळकर उपस्थित होते.‌ या स्लॅबमुळे मोठा दिलासा येथील नागरिकांना मिळणार असून बिले ,वेंगुर्लेकर व सालईवाडा नागरिकांनी यासाठी नगरसेवक श्री. सुर्याजी यांचे आभार मानले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे