राज्यस्तरीय स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत आंबेगाव शाळेच्या स्काऊट पथकाचे घवघवीत यश
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
राज्य प्रशिक्षण केंद्र, सोनतळी जि.कोल्हापूर येथे दिनांक ३०/१२/२०२५ ते ०२/०१/२०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात शाळा आंबेगाव नं- १ च्या छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथकातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.आंबेगाव शाळेचे उपक्रमशील व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त स्काऊट मास्टर श्री.नितीन नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव शाळेच्या स्काऊट पथकातील विद्यार्थी कु.तनिश तेजस गावडे आणि आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय कुणकेरी येथे इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेले कु.प्रवीण सिताराम जंगले,कु.भावार्थ नवलु झोरे,कु.आर्यन रवि गावडे या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करीत शाळेमधून स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी पहिल्यांदा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सरपंच श्री.शिवाजी परब, उपसरपंच श्री.रमेश गावडे, मुख्याध्यापक श्री.प्रदिपकुमार म्हाडगुत सर,आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय कुणकेरीच्या मुख्याध्यापिका श्रीम.अर्चना सावंत मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.तेजस्वी गावडे, कोलगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम.भावना गावडे मॅडम,कोलगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा स्काऊट मास्टर श्री.अरविंद मेस्त्री तसेच आंबेगाव मधील पालक व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रशालेचे हे राज्यस्तरीय यश निश्चितच प्रेरणादायी आहे.


