न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी कोर्ट कडील वळणावरील संरक्षण भिंत बांधावी…… सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी कोर्ट कडील वळणावरील संरक्षण भिंत नगरपरिषदेने त्वरित बांधून दुर्घटना टाळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केली आहे. चार वर्षांपूर्वी मोती तलावाच्या काठी मंगळवारचा बाजार भरवला जात होता त्यावेळी एक दुर्घटना घडली होती कोर्टाकडून बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या वळणा लगत फूटपाथवर फळ विक्री करत असलेल्या एका फळ विक्रेत्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी नागरिकांच्या मदतीने त्या फळ विक्रेत्याला खाली नाल्यात उतरून बाहेर काढले व तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच दुर्दैवी निधन झाले. त्याच वेळी रवी जाधव यांनी त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी म्हणून नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते परंतु या गंभीर विषयाकडे त्या वेळी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप रवी जाधव यांनी केला आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी सदर नाल्याची नुकतीच साफसफाई करून घेतील.काही वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून त्या नाल्यामध्ये कृत्रिम वन्यप्राणी बसवण्यात आले होते. त्यामुळे तो भाग पर्यटनाचा ठरला आहे. बाहेरून येणारे पर्यटक व सहलीची मुले त्या ठिकाणी ते कृत्रिम प्राणी पहाण्यासाठी गर्दी करतात अशावेळी कुठच्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याकरिता नगराध्यक्षांनी या गंभीर विषयाची दखल घ्यावी. सध्यस्थितीत त्याच ठिकाणी फूटपाथचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासोबतच हेही काम करून घेतल्यास पुढे होणारी दुर्घटना टळू शकते.
तसेच शहरात पावसामध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत होते या अपघातांचं गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते. परंतु वाहनांच्या सततच्या वरदळीमुळे पुन्हा तेथे खड्डे तयार झाले आहेत. तसेच ठीक ठिकाणी गॅस पायपिंगसाठी रस्ते खोदाईमुळे अपघात होण्याची संभावना आहेच. सावंतवाडी बाजारपेठेमध्ये धुळीच साम्राज्य होऊन व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. मोती तलावाचे पाणी पूर्णपणे खराब होऊन पाण्याला दुर्गंध येत आहे. या महत्त्वाच्या सर्व विषयांकडे नगराध्यक्षांनी लक्ष घ्यावे अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे