मुंबई-कोकण प्रवासाला नवी गती: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी नवीन रेल्वे सेवेचा शुभारंभ; ठाणे स्थानकात जल्लोषात स्वागत
मुंबई/ प्रतिनिधी
अखेर मुंबई आणि कोकण यांच्यातील ऋणानुबंध अधिक घट्ट करणारा नवा अध्याय आज सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते सावंतवाडी दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.
या विशेष सेवेच्या शुभारंभानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकावर स्वागत सोहळा पार पडला. याप्रसंगी खासदार श्री. नरेश म्हस्के आणि मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
गाडी ठाणे स्थानकात दाखल होताच ‘गौरी गणपती उत्सव समिती, ठाणे (प.)’ तसेच ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग)’ यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत आणि घोषणा देत या रेल्वेचे उत्साहात स्वागत केले. आगामी सणासुदीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून प्रवाशांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


