न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोकणासह घाटमाथ्यावर आज पावसाचा इशारा … अलर्ट जारी

मुंबई / वृत्तसंस्था

कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहून तापमानात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.”

ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

येलो अलर्ट: मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, चंद्रपूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात इतर ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे