न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीतील विजेच्या समस्यांवर तात्काळ कार्यवाही करा : राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांचे आदेश

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

  सावंतवाडी विधानसभा मतदार संघात वारंवार उद्भवणाऱ्या विजेच्या समस्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी व मतदार संघातील 33 केव्ही वाहिन्या भुमिगत करणे या विषयाबाबत नाम.श्रीम. मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री, ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार नुकतीच मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

एम.एस.आर.डी.सी. कार्यालय, निर्मल भवन, मुंबई येथे झालेल्या या बैठकीला सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, महावितरण/महा पारेषण, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग (VC द्वारे), संचालक (संचालक/प्रकल्प/वित्त/वाणिज्य) महावितरण महापारेषण, मुख्य अभियंता रत्नागिरी महावितरण, मुख्य अभियंता कराड महापारेषण, अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग, महावितरण व विषयांशी संबंधित इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. दोडामार्ग,सावंतवाडी,वेंगुर्ला येथील जास्तीत जास्त भाग हा जंगल, झाडाझुडपांनी युक्त आहे . पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडत असतात. सोसाट्याचा वारा व वादळा मुळे फांद्या तुटून पडत असतात .त्यामुळे विजेच्या तारांना नुकसान पोहोचत असते. भूमिगत वीज वाहिन्या घातल्यास झाडांमुळे होणारा उपद्रव होणार नाही. वाहिन्या तुटण्याचे, पोल पडण्याचे प्रमाण कमी राहील. भूमिगत विद्युत लाईन मुळे वीज पुरवठ्याला व्यत्यय येणार नाही. त्यामुळे मतदारसंघातील विज वाहिन्या या भूमिगत करण्याबाबत आमदार दीपक केसरकर यांनी आग्रही मागणी केली.

बैठकीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील वारंवार उद्धवणाऱ्या विजेच्या समस्या बाबत तात्काळ कार्यवाही करण्याचा सूचना मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच इतर काही तातडीच्या उपाययोजनांबाबत निर्देशही देण्यात आले. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 33 केव्ही विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाही करण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार भूमिगत विद्युत वाहिन्या करण्याचा प्रस्ताव तात्काळ सर्वे करून शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे