न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सावंतवाडीत शिवप्रेमींची भव्य ‘ शिवचेतना रॅली ‘

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी शहरात ‘स्वराज्य संघटना’ आणि शहरातील शिवप्रेमींच्यावतीने भव्य ‘शिवचेतना रॅली’ काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भगवे फेटे परिधान करत, भगवा ध्वज उंचावत अबालवृद्ध महिला या रॅलीत सहभागी झाल्या. सावंतवाडी राजवाडा येथून या रॅलीला प्रारंभ झाला. गेली १४ वर्षे या रॅलीचेआयोजन केले जाते.
सावंतवाडी राजवाडा येथून या रॅलीचा शुभारंभ झाला. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी लखमराजे भोंसले व भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. परब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. या रॅलीचे मुख्य आकर्षण वेशभूषा स्पर्धा ठरली. चिमुकल्यांसह शालेय विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वस्त्र परिधान करत या रॅलीत सहभाग घेतला. ऐतिहासिक देखावे देखील या निमित्ताने साकारण्यात आले होते. रॅलीतील घोडेस्वार खास आकर्षण ठरला. शहरातून निघालेल्या रॅलीची जिमखाना येथे सांगता करण्यात आली. यावेळी लखमराजे भोंसले, भाजपचे युवा नेते विशाल परब, सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, श्रीपाद सावंत, सुशांत पाटणकर, ॲड. राजू कासकर, अजित सांगेलकर, संदीप धुरी, संजय पार्सेकर, प्रमोद तावडे, महेश पांचाळ, समीर सावंत, अमोल साटेलकर, साक्षी वंजारी, कृतिका कोरगावकर, अंकित तेंडुलकर, हर्षल सावंत, विजय कदम, सायली शिंदे, पल्लवी रेगे आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे