राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिव जयंतीचे आयोजन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
छत्रपती शिवाजीराजे जयंती निमित्त आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी राजा शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. दरवर्षीप्रमाणे राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या वर्षी हि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराजांच्या जयंतीनिमित्त बबन साळगावकर यांनी सर्वांना साखर वाटली.
या प्रसंगी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर , नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, दीपक सावंत, रवी जाधव, सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत, बंड्या तोरसकर,, दिलीप पवार, अशोक पेडणेकर, दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, मंगेश पडते, सत्यम सावंत, सुरेश ठाकूर, चिनू खानोलकर, प्रदीप नाईक, महादेव राऊळ, संजय साळगावकर, सोन्या कासार , शुभम मळकाचे, मनोज घाटकर, संदीप नाईक, राजेंद्र सांगेलकर, मनोज राऊळ, सचिन तेली उपस्थित होते.


