न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सामाजिक बांधिलकीच्या जीवनरक्षक अभियानामुळे एका महिलेला जीवदान

 

सिंधुदुर्ग  /  राजू तावडे 

   सावंतवाडी सबनीसवाडा येथील रहिवासी रुकसाना मुल्ला दोन-तीन दिवसापासून घराबाहेर दिसली नाही. त्यामुळे तेथील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. रात्री बारा वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा ती एकटीच फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती तेथील रहिवाशांनी पोलिसांना दिली. त्यानंतर रुकसाना मुल्ला यांना बाहेरून जोर जोराने हाका मारल्या,

परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडून तेथील रहिवाशांनी तिच्या घरात प्रवेश केला. तेव्हा ती बाथरूम मध्ये अस्वस्थ अवस्थेत आढळून आली. कदाचित ती दोन दिवसापासून बाथरूम मध्ये पडून होती असा अंदाज लावण्यात आला. तिला लगेच उचलून बेडवर झोपवले. त्यावेळी ती खूप घाबरलेल्या अवस्थेतमध्ये होती. मोठ्याने आरडाओरड करत होती. पोलीसांनी गुरुवारी रात्री १२.४५ वाजता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला. रवी जाधव संस्थेची रुग्णवाहिका घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी संस्थेच्या महिला सचिव समीरा खलील, हेलन निब्रे, रूपा मुद्राळे तसेच लक्ष्मण कदम यांच्याशी संपर्क साधून त्यांना लगेच घटनास्थळी बोलून घेतले. रात्री दोन वाजता संस्थेच्या रुग्णवाहिकेमध्ये घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तत्पूर्वी तिची मानसिक अवस्था अतिशय चिंताजनक होती. प्राथमिक उपचारानंतर तीला थोडे बरे वाटले. तिचे नातेवाईक कणकवली येथे राहतात ते पहाटे तीन वाजता आले तोपर्यंत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सदर महिले सोबत पहाटे तीन वाजेपर्यंत होते. सदर महिलेचे नातेवाईक आल्यानंतर त्या महिलेला त्यांच्या ताब्यात देऊन नंतरच संस्थेचे कार्यकर्ते घरी गेले. सदर महिलेची तब्येत आता ठीक आहे. नातेवाईकांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. संस्थेच्या या जीवनरक्षक अभियानासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, समीरा खालील, हेलन निबरे, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व राहील बाडिवाले यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे