न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

SPK महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचे प्राध्यापक वासुदेव बर्वे यांना पीएच.डी. पदवी प्रदान.

सिंधुदुर्ग / मनोज घाटकर 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने वासुदेव गोविंद बर्वे यांना लेखांकन आणि लेखापरीक्षण (Accountancy and Auditing) या विषयात डॉक्टरेट अर्थात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

बर्वे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत आपले संशोधन पूर्ण केले. “Comparative Accounting Study of Old and New Pension Schemes of Primary Teachers in Maharashtra (with Special Reference to Konkan Region)” हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या जुन्या व नवीन पेन्शन योजनांचा तुलनात्मक लेखांकनात्मक अभ्यास करताना त्यांनी विशेषतः कोकण विभागावर लक्ष केंद्रित केले. शिक्षकांच्या पेन्शन योजनांशी संबंधित आर्थिक व लेखांकनविषयक पैलूंचा अभ्यास त्यांच्या संशोधनातून अधोरेखित झाला आहे.

त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला गेला आहे. वासुदेव बर्वे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे कॉलेज चे मुख्याध्यापक, सर्व प्राध्यापक, व कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

5/5 - (3 votes)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे