न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माध्यमिक विद्यालय नाटळ येथे अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सन्मान

सिंधुदुर्ग / राजू तावडे

कणकवली तालुक्यातील राजवाडी उत्कर्ष मंडळ, नाटळ, मुंबई संचलित संस्था व माध्यमिक विद्यालय नाटळ यांच्या वतीने गुरुवारी नवदुर्गा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली चार वर्षे राजवाडी माध्यमिक विद्यालय येथे कै.वासंती वसंत सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुनबाई सौ. उमा भालचंद्र सावंत यांच्या वतीने नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. ह्या वर्षी जिल्हास्तरीय विविध क्षेत्रातील नऊ महिलांना सन्मानित करण्यात आले.त्यात कणकवली येथील समाजसेविका तथा ज्येष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शाल ,श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यास आले .कार्यक्रम साठी मोठ्या संखेने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यालयचे चेअरमन श्री. नितीन सावंत, संचालक श्री. राजू सावंत इतर कमिटी सदस्य उपस्थितीत होते. विद्यालयच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणिता तेली आणि शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थी ह्यांनी कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे