न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संजू परब यांनी केले शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे स्वागत

 

सिंधुदुर्ग  /  राजू तावडे 

  महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना मंगळवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडी शहरात आगमन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश शंकर राऊळ, लखमराजे भोसले, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती श्री. सचिन देसाई, नगरसेवक श्री. बाबू कुडतरकर, तुषार साळगावकर, भूषण सारंग, शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, शिक्षणाधिकारी श्री. किंजवडेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री दादाजी भुसे यांच्या सावंतवाडी आगमनावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे