महिला सक्षमिकरण उद्दिष्ट गौरवशाली: नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले
सिंधुदुर्ग / राजू तावडे
महिला सक्षमिकरण हे उद्दिष्ट गौरवशाली असून आपण सदैव अशा उपक्रमांना मी पाठबळ देणार असून सावंतवाडी नगरीत असे उपक्रम स्वागतार्ह आहेत. या फाउंडेशनच्या मागे मी खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले यांनी दिली. सक्षम स्त्री फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
‘सक्षम स्त्री’ फाउंडेशनच्या माध्यमातून सावंतवाडीत महिलांसाठी पर्यटन सेवेतून घर बसल्या रोजगार निर्मिती उपलब्ध करून देण्यासंदर्भातील मार्गदर्शन वर्गाचे आज शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात 300 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या.
सक्षम स्त्री फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. नीलम नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हे फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, सांस्कृतीक, क्रीडा या समजभिमुख घटकांशी निगडित असून महिला सबलिकरण हा या फाउंडेशनचा प्रमुख उद्दीष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माय ट्रायव्हेलाईटचे संचालक यांनी पर्यटन विषय हा अतिशय लोकप्रिय व्यवसाय असून व्यावसायिक क्षेत्रात मोडणारा आहे. हे महिलांना घरबसल्या रोजगार मिळणार सहज सोपे असे माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला सबलीकारणासाठी ‘सक्षम स्त्री’ फाउंडेशनचे कार्य स्तुत्य असुन आपल्याकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धार भोसले, सक्षम स्त्री फाउंडेशनच्या अध्यक्ष नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक, माय ट्रायवेलाईट सखी इनिशिवेटिव्हचे संचालक नितीन येरुणकर, निलेश उपाध्याय, सौ. रिद्धी कांबळी, संस्थेच्या उपाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. सुनीता पेडणेकर, सचिव सौ. मेघा राणे -गावडे, खजिनदार नगरसेविका सौ. दुलारी रांगणेकर, सहसचिव सौ. अंकिता बांदेकर -नेवगी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. खुशी नाईक व सौ.अंकिता बांदेकर यांनी केलं. तर आभार सचिव सौ. मेघा राणे -गावडे यांनी मानले.


