न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शवविच्छेदनासाठी सफाईगार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मनसेचे मिलिंद सावंत यांच्या पाठपुरावा

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

    सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या शवविच्छेदन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सफाईगार कर्मचाऱ्यांची नियुक्ती अखेर करण्यात आली आहे. बांदा व आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रांत कार्यरत असलेल्या दोन सफाईगार कर्मचाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेसंदर्भात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेले सफाईगाराचे पद रिक्त होते. त्यामुळे संबंधित कामासाठी कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र काढून बांदा व आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाईगार कर्मचाऱ्यांना शवविच्छेदन प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आंबोली येथील श्री. कांबळे व बांदा येथील श्री. शेलकर यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

शवविच्छेदनासारख्या संवेदनशील प्रक्रियेसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागाने ही कार्यवाही केल्याने या समस्येवर तात्पुरता मार्ग निघाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे