न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत भाजपा तर्फे भव्य बॉडी बिल्डिंग व भव्य नरकासुर स्पर्धा: उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर

सिंधुदुर्ग / राजू तावडे

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चावतीने सावंतवाडी विधानसभा आयोजित भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा तसेच भव्य नरकासुर स्पर्धा दीपावली निमित्त भरवण्यात येणार आहे. बॉडी बिल्डर स्पर्धेचे विशेष आकर्षण मुळचे गोवा येथील दुबईस्थित आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर विजेते निवेद शेटकर हे राहणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली मंडळ अध्यक्ष विनेश तावडे, दिलीप भालेकर आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बॉडी बिल्डिंग स्पर्धा दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ६ वा. जगन्नाथराव भोसले उद्यान येथे भरवण्यात येणार आहे. तसेच नरकासुर स्पर्धा दि. ०७ नोव्हेंबर रोजी शिवरामराजे भोसले पुतळ्याजवळ मोती तलाव, अमूल आईस्क्रीमच्या समोर कॉर्नरला आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती विनेश तावडे यांनी दिली. या भव्य बॉडीबिल्डींग स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व युवा नेते विनोद राऊळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उपसभापती गौरव मुळीक यांनी दिली.
दरम्यान, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया या संकल्पनेद्वारा पूर्ण देशभर असे फिटनेस संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने पूर्ण देशभर रन फॉर इंडिया अशा अनेक संकल्पना पूर्ण देशभर चालू आहेत. त्यापैकीच एक फिट इंडिया या संकल्पने च्या माध्यमातून ‘विशालश्री’ ही भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन युवा मोर्चातर्फे करत आहोत. या स्पर्धेचे विशेष आकर्षण आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर विजेते निवेद शेटकर हे असणार आहेत. फीट इंडियासह नशामुक्त भारत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देखील नशा मुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे युवकांना बॉडीबिल्डींकडे वळवण्यासाठी प्रयत्न आहे. युवकांनी नशेकडे न जाता व्यायामाकडे वळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच नरकासुर स्पर्धाही दिवाळीच्या पुर्वसंध्येला होत आहे. या निमित्ताने रील स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. खुला गट व बालगट अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार असून या दोन्ही कार्यक्रमांना सावंतवाडीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे