सिंधुदुर्ग ATS मध्ये पहिले वाहन यशस्वीरीत्या उत्तीर्ण..!
सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर
सिंधुदुर्ग येथील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रावर (Automated Testing Station – ATS) पहिले वाहन यशस्वीरीत्या तपासणी प्रक्रियेतून उत्तीर्ण झाले. हा सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा आहे.
वाहनांची तांत्रिक तपासणी अधिक अचूक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने ATS ही महत्त्वपूर्ण सुविधा आहे. वाहनांची रस्त्यावरील सुरक्षितता सुनिश्चित करणे, अपघातांचा धोका कमी करणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणे, हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे.


