न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

देवगड बीच परिसरात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी कठोर कारवाई केली. सकाळी साधारण १० ते ११ वाजता विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवगडची ‘स्वामीराज’ (IND-MH-५-MM-५२४८) ही नौका जप्त करून देवगड बंदरात आणली. काही अन्य पर्ससीन नौका अधिकाऱ्यांना पाहताच पळ काढल्या.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी देवगड किरण वाघमारे यांनी पोलिस प्रशासन व सुरक्षा रक्षकांच्या मदतीने राबविली. देवगड समोर केवळ ३ ते ४ वाव पाण्यात महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ च्या स्पष्ट तरतुदींचे उल्लंघन करत अवैध पर्ससीन मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळताच तात्काळ कारवाई करण्यात आली.

‘स्वामीराज’ नौकेची कसून तपासणी केली असता एकूण २६ परप्रांतीय खलाशी आढळून आले. कायद्यानुसार परवानगी असलेल्या १२ सागरी मैलांपलीकडे मासेमारी करण्यासाठी एक्सेस पास असतानाही या नौका किनारी भागात अवैध पद्धतीने मासेमारी करत असल्याची तक्रार होती. या कारवाईतून त्याची पुष्टी झाली आहे. नौका ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणण्यात आली असून अधिनियमांतर्गत तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी या कार्यवाहीचे स्वागत केले असून प्रशासनाने नियमित पाळत ठेवून कठोर अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने आता किनारी भागात नियमित गस्त वाढवून अवैध मासेमारी रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारीचे हितसंबंध जपले जातील आणि सागरी संसाधनांचे संवर्धन होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे