न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कवी दीपक पटेकर यांना “सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन ” पुरस्काराने सन्मानित 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

        सावंतवाडी येथील कवी दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान मुंबई या संस्थेचा सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन (गद्य) पुरस्कार संस्थेच्या अध्यक्षा मानसी पंडित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित चतुर्थ साहित्य संमेलन शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रोटरी क्लब हॉल, नौपाडा ठाणे येथे पार पडले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष गझलकार डॉ.सुधाकर गर्दे, उद्घाटक गझलकार डॉ.राजेंद्र केगार, कवी संमेलन अध्यक्ष डॉ. सुभाष कटकदौंड, स्वागताध्यक्ष दीपाली घाटगे, अमृता गोडबोले, गझलकार किरण वेताळ आदी मान्यवर उपस्थित होते. दीपक पटेकर यांनी “अंतरीचे बोल” या सदराखाली ललित लेख स्तंभलेखन केले होते. त्यांच्या या लेखनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान ही संस्था गेली सात वर्षे मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. दरवर्षी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून साहित्यिकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी संस्थेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेते, वर्षभर संस्थेने आयोजित केलेल्या स्तंभलेखन पद्य व गद्य विभागात उल्लेखनीय लेखन करणाऱ्या साहित्यिकांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरवीण्यात येते. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शंभरहून जास्त साहित्यिक उपस्थित होते. संस्थाध्यक्ष मानसी पंडित, खनिजदार निखिल कोलते, प्रमोद कोलते, मनाली पंडित, किरण वेताळ, कवयित्री डॉ.मानसी पंडित, राजेश नागुलवार, विनिता कदम, पल्लवी भागवत, योगिता तकतराव आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे