न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बुलढाण्यात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

बुलढाणा/ सचिन व्यवहारे 

बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे… येथे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

घटनेनंतर आरोपी मुलीला घेऊन मलकापूर रेल्वे स्थानकात गेल्याची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला अटक केली असून पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले आहे…मुलीवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे