जालन्यातील शहापूर जवळ दोन एस.टी. बस अपघातात ३० प्रवाशी जखमी
जालना/ प्रतिनिधी
जालन्यातील अंबड-वडीगोद्री रस्त्यावरील शहापूर परिसरात दोन एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच बसमधील शाळकरी विद्यार्थ्यांसह साधारण २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
विद्यार्थ्यांची बस अंबडकडे जात असताना अपघात
स्थानिक प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मानव विकास मिशन’ची बस शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन भांबेरी येथून अंबडच्या दिशेने जात होती. याच दरम्यान शहापूर परिसरात समोरून येणाऱ्या दुसऱ्या बससोबत या बसची जोरदार धडक झाली. मानव विकासच्या बसमध्ये जवळपास २५ ते ३० विद्यार्थी होते, तर दुसऱ्या बसमध्ये १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. या धडकेत दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे”


