इराण गेलं तेल लावत…. भारतीय आणि पाक समुद्रात सापडले खनीज तेलाचे साठे
नवी दिल्ली/
भारताच्या हाती एक मोठा जॅकपॉट लागला आहे, यामुळे भारामधील गॅस टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. हा जॅकपॉट म्हणजे अंदमानच्या समुद्रात नौसर्गिक वायूच्या विहीरी सापडल्या आहेत, याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी यासाठी इंडियन ऑइलचं अभिनंदन देखील केलं आहे. होर्मूज संकटात हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूच्या विहिरी सापडल्यामुळे गॅसचं संकट दूर होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान दुसरीकडे पाकिस्तानमध्ये देखील कच्च्या तेलाचा एक मोठा साठा सापडला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हा कच्च्या तेलाचा साठा सापडला आहे. गॅसचा देखील साठा आढळून आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला देखील दिलासा मिळणार आहे.


