न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांद्यात १ नोव्हेंबरला भव्य आरोग्य तपासणी शिबिर

 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

     बांदा व परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, या उद्देशाने मराठा समाज, बांदा आणि बांदेश्वर आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य मोफत व सवलतीच्या दरातील आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा येथील साईमाऊली मेडिकलच्या नजीक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या जुन्या इमारतीत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात नेत्रतपासणी व डोळ्याच्या पडद्याची (रेटिना) तपासणी मोफत करण्यात येणार असून, विविध आजारांच्या तपासण्या, शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचारांसाठी सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे शिबीर खुले असून सर्व वयोगटातील नागरिक विद्यार्थी यात सहभागी घेऊ शकतात.

या शिबिराची माहिती बांदेश्वर आय क्लिनिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डॉ. संजय केसरे, डॉ. जयश्री केसरे, मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत, सचिव सीताराम गावडे, उपक्रम समन्वयक तथा माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, महेश मोर्ये, हेमंत मोर्ये, श्यामसुंदर चव्हाण, माधवी गाड, अवंती पंडित आदी उपस्थित होते.

कुडाळ येथील प्रसिद्ध डॉ. केसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला देणार आहे. यामध्ये डॉ. जयश्री केसरे, डॉ. संजय केसरे, डॉ. अनिकेत वज्राटकर आणि डॉ. सौरभ पाटील यांच्यासह वैद्यकीय तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे.

शिबिरामध्ये नेत्रतपासणी, डोळ्याच्या पडद्याची तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासणी, अस्थिरोग तपासणी आणि स्त्रीरोग तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रक्तातील साखर, सीबीसी व इतर रक्त तपासण्या, सोनोग्राफी, ईसीजी, २डी इको आणि एक्स-रे या तपासण्याही सवलतीच्या दरात करून घेता येणार आहेत.

डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि गरजू नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी विशेष नेत्रतपासणीवर भर देण्यात येणार आहे. या शिबिरात अवघ्या २५० रुपयांत चष्मा उपलब्ध करून देण्यात येणार असून, मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्याची सुविधा उपलब्ध असेल. तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात रुग्णांना मोफत औषधांचेही वाटप करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भार कमी करून आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेता येणार आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार व योजनेत समाविष्ट असलेल्या उपचारांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित उपचारांची उपलब्धता याबाबत लाभार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.

ग्रामीण भागात अनेक नागरिक आर्थिक अडचणींमुळे किंवा वेळेअभावी आरोग्य तपासण्या पुढे ढकलतात. त्यामुळे आजारांचे वेळेत निदान होण्यात अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन मराठा समाज, बांदा आणि बांदेश्वर आय क्लिनिक यांच्या पुढाकारातून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी परिमल सावंत (मो. 90675 66879) सीताराम गावडे (मो. 94049 32933), नीलेश मोरजकर (मो. 9763717790) किंवा प्रशांत दळवी (मो. 94212 65140) यांच्याशी संपर्क साधावा.

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे