न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी शाळा नं. २ मध्ये शनिवारी ‘किलबिल’ वार्षिक स्नेहसंमेलन

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर (जि. प. प्रा. पीएम श्री शाळा सावंतवाडी नं. २) या प्रशालेचा ‘किलबिल’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शनिवार दिनांक १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५:३० वाजता प्रशालेच्या प्रांगणात हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे.
या स्नेहसंमेलनासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती श्री. सुधीर आडीवरेकर, नियोजन व पर्यावरण सभापती श्री. मोतीराम नेवगी, आणि उद्यान व पर्यटन सभापती सौ. शर्वरी मडगांवकर नगरसेविका सौ. दुलारी रांगणेकर, सौ. शर्वरी धारगळकर, ॲड. सौ. सायली दुभाषी यांची विशेष उपस्थिती असेल.
सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सविता परव आणि केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकूर उपस्थित राहून यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
‘किलबिल’ या नावाने होणाऱ्या या स्नेहसंमेलनात शाळेतील चिमुकल्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर होणार आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी कु. सानवी देसाई आणि कु. आराध्य आपटे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि शालेय समित्या या सोहळ्याच्या तयारीसाठी मेहनत घेत आहेत.
शाळा सांस्कृतिक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि पालक शिक्षक संघ यांच्या वतीने या सोहळ्याला शिक्षणप्रेमी आणि पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे